August 6, 2026

दोन लाखांची खंडणी; चार पत्रकारांवर गुन्हा दाखल

0

दोन लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी चार पत्रकारांवर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की  23 नोव्हेंबर रोजी गीता आहुजा यांनी चारही पत्रकारांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 329 (4), 308 (2) , 115(2), 324 (2) 351(2), 3 (5) प्रमाणे सुदाम खारकर, चंद्रभुवन विश्वकर्मा, अभिषेक शिगवन आणि मीनल पवार यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तर गुन्हा दाखल असलेल्या पत्रकारांनीही गीता आहुजा व त्यांच्या साथीदाराविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. तसेच गुन्हयाचे गंभीर प्रकरण असल्याने पोलिसांनी योग्य दिशेनं तपास सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. खंडणीखोर पत्रकार नेमके कोणत्या वृत्तपत्राचे कोणत्या चॅनेलचे आहेत अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदारे करीत आहेत. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेल्या चारही पत्रकार हे पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याची माहिती ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *