भारतीय लष्कराची हवाई तुकडी कॉम्पॅक्ट आर्मी एव्हिएशनच्या 41 आणि 42 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन
भारतीय लष्कराची हवाई तुकडी कॉम्पॅक्ट आर्मी एव्हिएशनच्या 41 आणि 42 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभnअँकर भारतीय लष्कराची हवाई तुकडी असलेल्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल कॅट च्या 41 व्या आणि 42 व्या तुकडीचे दीक्षांत संचलन आणि यशस्वी पायलट्स ना विंग्स प्रदान कार्यक्रम नाशिक रोड जवळच्या गांधीनगर एअरफील्ड येथे संपन्न झाला कार्यक्रमांमध्ये विविध हेलिकॉप्टर ची चित्त थरारक प्रात्यक्षिके प्रत्यक्ष युद्धभूमीवर शत्रूचे तळ उध्वस्त करताना करण्यात येणारी कारवाई त्याची प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली या दीक्षांत संचलन कार्यक्रमत डायरेक्टर जनरल ऑफ आर्मी एव्हिएशन सेनापदक विजेते लेफ्टनंट जनरल श्री विनोद नाबियार यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हेलिकॉप्टर पायलटणा विंग्स प्रदान करण्यात आले तसेच या प्रशिक्षणामध्ये विविध विषयांमध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त प्रशिक्षणार्थींना चषक आणि पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले यामध्ये बेस्ट पायलट अरविंद सिंग पुरी बेस्ट ग्राउंड सब्जेक्ट लेफ्टनंट कर्नल आदित्य फ्लाईंग परफॉर्मन्स प्रथम कॅप्टन अर्चित जनजा चित्ताट्रॉफी विजेता कॅप्टन सक्षम गोसावी आदिमसह एकूण 12 विजेत्यांना सन्मानित करण्यात आले आज सन्मानित करण्यात आलेल्या प्रशिक्षण तुकडी मध्ये चार महिला पायलटसह भारतीय नौदल आणि मित्र राष्ट्रांच्या सेनेतील पायलटचा ही समावेश आहे कार्यक्रमांमध्ये भारतीय लष्करात अनेक वर्षापासून दोन ते चार व्यक्तींसाठी वापरात असलेले चित्ता चेतक हेलिकॉप्टर व त्यानंतर मोठ्या संख्येने माणसे आणि सामग्रीची वाहतूक करण्यासाठी काही वर्षांपूर्वी दाखल झालेले ध्रुव हेलिकॉप्टर व दूरनियंत्रित मानव रहित विमान प्रणाली आदी दीक्षांत संचलनाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात आली होती दीक्षांत संचालनाचा शुभारंभ आणि समारोप जमिनीवर लष्करी वाद्य वृंदाच्या साथीने आणि प्रशिक्षणार्थींच्या कवायतीने तर अवकाशातून ध्रुव आणि रुद्रा हेलिकॉप्टरच्या सलामीने झाला यावेळी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना लेफ्टनंट जनरल विनोद नामबियार म्हणाले की युद्धभूमीवर पायलटचे काम आव्हानात्मक आहे आणि हे आव्हान पायलटने सक्षमपणे पेललेले आहे प्रशिक्षणामध्ये अवकाशात प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यापेक्षा सिम्युलेटर मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी आणि असे सिम्युलेटर एचएएल च्या सहाय्याने विकसित करण्यावर अधिक भर दिला जात असल्याचे नांबीयार यांनी सांगितले प्रशिक्षण तळावर अत्याधुनिकीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे.nnhttps://youtu.be/NbUZ2RbVhx4nnआर्मी एव्हिएशनच्या कायापालटा बद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला 2003 मध्ये फक्त तीन अभ्यासक्रम चालविले जात आज 17 अभ्यासक्रम चालविण्यात येतात भविष्यात प्रशिक्षण क्षमतेचा अधिक विस्तार अपेक्षित आहे तंत्रज्ञान हे प्रत्येक वैमानिकाच्या डीएनए मध्ये असते आणि आजचे वैमानिक खुलेपणाने स्वीकारतील ज्यामुळे उद्याच्या युद्ध क्षेत्रावर वर्चस्व गाजवता येईल तरुण वैमानिकांना सल्ला देताना ते म्हणाले की आपण चालवत असलेले हेलिकॉप्टर व अन्य संबंधित यंत्रणा यांच्या क्षमता आणि मर्यादा याबाबत आपण परिचित आणि जागरूक असणे आवश्यक आहे लष्करी उड्डाणे नेहमीच जोखमीने भरलेली असतात म्हणून सर्व मोहिमांमध्ये उड्डाण सुरक्षा व्यापक आणि महत्त्वपूर्ण आहेत असेही नांबीयार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक
