August 6, 2026

जनसंघ पार्टी ते भारतीय जनता पार्टी 97 वर्षाचे जेष्ठ एकनिष्ठ

0

पूर्वीचा भारतीय जनसंघ पार्टी व आताचा भारतीय जनता पार्टी यात एक निष्ठा ने काम करणारे कार्यकर्ते गणपत त्रंबक बोरसे वय 97 यांनी 1975 सालात भारतीय जनसंघ पार्टीत असताना आणीबाणीच्या काळात 18 महिने तुरुंगवास भोगला होता. गणपत त्रंबक बोरसे यांनी एक निष्ठाने भारतीय जनता पार्टीत काम केले ते आता 97 वर्षाच्या आहेत. आपली बांधिलकी म्हणून गणपत बोरसे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात वसंत स्मृती येथे येऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना भेटले तथा त्यांनी विनंती केली की पाच तारखेच्या मंत्रिमंडळाच्या कार्यक्रमात मला यायचे आहे व मला भारतीय जनता पार्टीच्या नाशिक कार्यालयातून पास मिळावा अशी कार्यकर्त्यांना विनंती केली. गणपत बोरसे आडगाव येथे राहतात ते सिटी बसणे नाशिक शालिमार या ठिकाणी आले तेथून पाई प्रवास करीत ते वसंत स्मृतीमध्ये दाखल झाले. भारतीय जनता पार्टीच्या जुन्या प्रवासाला त्यांनी उजाळा दिला. गणपत बोरसे यांच्या तीन पिढ्यांचे योगदान भारतीय जनता पार्टीसाठी आहे असे त्यांनी कार्यकर्त्यांच्या चर्चेत सांगितले. गणपत बोरसे यांचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वसंत स्मृती या भाजपच्या प्रमुख कार्यालयात सन्मान करून त्यांचा सत्कार केला यावेळी भाजपचे  नाशिक महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील केदार, चिटणीस हेमंत शुक्ल, अनु.जातीमोर्चा.प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *