August 6, 2026

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, १,५६५ मतदान केंद्रांवर सुरक्षाव्यवस्था

0

नाशिक लोकल | सतिश रूपवते  : नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी व्यापक प्रतिबंधात्मक कारवाई व कडेकोट बंदोबस्त उभारला आहे. १५ सप्टेंबर रोजी मतदान व १६ सप्टेंबर रोजी मतमोजणी पार पडणार असून, शहरातील एकूण ४५८ मतदान केंद्रे व १,५६५ बूथवर शांततेत मतदान होण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत.nnनिवडणूक प्रक्रियेपूर्वी ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली. सीआरपीसी कलम १२६ अंतर्गत २७०, कलम १२९ अंतर्गत ४५१ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये २६ जणांवर कारवाई करण्यात आली. एमपीडीए अंतर्गत २ आरोपींना स्थानबद्ध करण्यात आले असून, १७ जणांविरुद्ध टोळीविरोधी कारवाई व ४५ जणांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. बीएनएस कलम १६३(२) नुसार २३१ गुन्हेगारांविरुद्ध बाहेर काढण्याचे आदेशही बजावण्यात आले.nnअवैध दारू व अंमली पदार्थांविरोधात राबविलेल्या मोहिमेत २७ छाप्यांतून अवैध दारू जप्त करण्यात आली. एनडीपीएस कारवाईत ४ छाप्यांतून २३.१४ लाख रुपयांचा गांजा, खंडी व इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अवैध शस्त्रांविरोधी कारवाईत १२ बंदुका व ७ धारदार शस्त्रे जप्त करून २६ गुन्हे नोंदवून २६ जणांना अटक करण्यात आली.nnमतदानपूर्व विशेष मोहिमेत १२ अवैध अग्निशस्त्रे व ७ घातक शस्त्रे जप्त करत १७ जणांना अटक करण्यात आली. निवडणूक बंदोबस्तासाठी ३ पोलीस उपायुक्त, ७ सहायक पोलीस आयुक्त, ४६ पोलीस निरीक्षक, ९६ उपनिरीक्षक, २६८ पोलीस अंमलदार, २ दंगा नियंत्रण पथके, २ शीघ्र प्रतिसाद दल, २ एसआरपीएफ तुकड्या आणि ९०० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.nnनाशिक शहरातील १४ संवेदनशील ठिकाणी विशेष गस्त व रूट मार्च सुरू असून, गुन्हेगार टोळ्या, दारू व अवैध व्यवसायांवर कडक नजर ठेवली जात आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे व सहायक आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण व्यवस्था उभारण्यात आली आहे. शांततेत, निर्भय वातावरणात मतदान व्हावे यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *