नाशिक जिल्हा न्यायालयात वकिलांचे एकदिवसीय कामबंद आंदोलन
नाशिक जिल्हा न्यायालयात वकिलांचे एकदिवसीय कामबंद आंदोल
nनाशिक लोकल – शिवाजी अढांगळे : नाशिक जिल्हा न्यायालयात वकील वर्गाशी व पक्षकारांशी कथित गैरवर्तन आणि अवमानकारक भाषेच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर वकील संघटनांनी मंगळवारी एकदिवसीय कामबंद आंदोलन पुकारले. नाशिकच्या न्यायालयीन इतिहासात प्रथमच अशा प्रकारचे आंदोलन झाल्याची चर्चा आहे.nnवकील बांधवांच्या म्हणण्यानुसार, पाच न्यायाधीशांच्या न्यायालयात वारंवार अयोग्य वागणूक आणि बोलण्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर न्यायालयीन कामकाजातून दूर राहण्याचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाला नाशिक शहर व परिसरातील वकिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.nnया कामबंद आंदोलनामुळे संबंधित पाच न्यायालयांमध्ये दिवसभर कोणतेही कामकाज झाले नाही. वकील संघटनांनी या आंदोलनाला वकील वर्गाच्या एकजुटीचा विजय असल्याचे म्हटले आहे. तसेच, या तक्रारींची योग्य दखल घेऊन न्यायप्रक्रियेत सुसंवाद व सन्मानाचे वातावरण निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.nnआज ज्या न्यायालयांमध्ये कामकाज झाले नाही, त्या पुढीलप्रमाणे आहेत—n
- n
- मा. श्रीमती आर. एम. पांढेरे, जिल्हा न्यायाधीश–१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश
- मा. श्री. आर. एस. कानडे, वरिष्ठ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश
- मा. श्री. एस. डी. हीवाळे, द्वितीय संयुक्त दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी
- मा. श्रीमती एस. एस. बांगड, षष्ठ संयुक्त दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी
- मा. श्री. एस. के. देवकर, संयुक्त दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग
n
n
n
n
n
nआंदोलनात सहभागी झालेल्या सर्व वकील बांधवांचे आभार मानण्यात आले.
