August 6, 2026

शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांचा राजीनामा मागे पण

0

नाशिक (नाशिक लोकल प्रतिनिधी )nnपण हे प्रश्न अनुत्तरीतnnएकीकडे आपण निष्ठेची गोष्ट करतात, त्याचवेळी पक्षप्रमुखांच्या निर्णयावर सार्वजनिकरित्या प्रश्नचिन्ह उपस्थित करतात? हा विरोधाभास नाही वाटत का?nnजर पक्षनेतृत्वावर आपल्याला विश्वास असेल, तर मतभेद पक्षांतर्गत न मांडता थेट माध्यमांमध्ये मांडण्याची गरज का पडली?nnभाऊलाल तांबडे आपल्या आधी आले आहेत, तरी त्यांच्या पत्नीचे तिकीट कापून आपल्या नातेवाईकांना देण्याचा अट्टाहास केलात?nnआपण किती व्यक्तींचे प्रवेश घडवले याची माहिती देऊ शकता का?nnजर पक्षाने उद्या आपल्याला चर्चा करण्यासाठी बोलावले तर राजीनामा मागे घ्याल का, की हा निर्णय अंतिम आहे का?nnयदाकदाचित पक्षाने आपले दोन्ही राजीनामे मंजूर केले तर अन्य कोणाच्या नेतृत्वाखाली सामान्य शिवसैनिक म्हणून काम कराल की दुस-या पक्षाची वाट धरुन शिवसेनेच्या विरोधात काम कराल?nnआपल्या कुटुंबात दोन तिकीटे दिली गेली होती. तरीपण अन्याय झाला असे आपल्याला खरोखर वाटते?nnएकीकडे आपण संघटना मजबूत केली असे सांगता, मात्र आज आपल्या विधानांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे व पक्षाचं नुकसान होतंय असं आपणास वाटत नाही का?nnतुम्हाला पद मिळाले तेव्हा तेही सौदेबाजीचेच होते का? जातात. मगnnउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः माझ्याशी चर्चा करून गैरसमज दूर केले आहेत आणि माझ्यासह सर्व नगरसेवकांना आज सायंकाळी मुंबई येथे भेटण्यासाठी बोलाविले आहे. आम्ही आमची बाजू त्यांच्यासमोर मांडणार आहोत, त्यामुळे, एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार मी माझ्या महानगरप्रमुखपदाचा आणि नगरसेवकपदाचा राजीनामा देणार नसल्याचे शिवसेना महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.nnअखेर शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांचा राजीनामा मागnnनाशिक महापालिकेच्या उपमहापौरपदाच्या निवडीवरून शिवसेना पक्षात नाराज होऊन नगरसेवक प्रविण तिदमे यांनी महानगरप्रमुख पदाचा आणि नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करून नॉट रिचेबल झाले होते. काल सकाळी तिदमे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, मी नाराज होऊन नॉट रिथेबल झालो नव्हतो. उपमहापौरपदाची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना पदाधिकारी, समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. त्यांच्या भावना तीव्र होत्या. सतत फोनवर आणि धारी गर्दी करून प्रत्येक जण हैथ विचारात होते की, आपले काय चुकले?, आपण कुठे कमी पडलो? सर्वांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मी नॉट रिपेबल झालो होतो. माझ्याशी संपर्क होत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्या कुटुंबियांशी संपर्क साधला. स्वतः एकनाथ शिंदे यांनी तिदमे यांच्यावर अन्याय होणार नाही, त्याला तातडीने माझ्याशी संपर्क करायला सांगण्याचा निरोप कुटुंबियांना दिला. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त होतो, त्यामुळे उपमहापौरपदाबाबतचे लेखी पत्र नाशिकला पाठविण्यात आले नाही. तुझ्यावर कोणताही अन्याय होणार नाही. तू मला भेटात्याशिवाय चुकीचा निर्णय घेऊ नकोस असे स्पष्ट आदेश दिले. तुझ्यावर आणि अन्य नगरसेवकांवर अन्याय होणार नाही असे स्पष्ट त्यांनी सांगितले. त्यामुळे, एकनाथ शिंदे यांचा आदेश आणि जनभावनेचा आदर करत मी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला असून आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत आमच्या काही मागण्या आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार आहोत, असे त्यांनी सांगितले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *