August 6, 2026

त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार व महिला मेळावा मुंबईत उत्साहात संपन्न

0

मुंबई (प्रतिनिधी) : त्याग, समर्पण आणि सामाजिक कार्याचे प्रतीक असलेल्या माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, मुंबई प्रदेशच्या वतीने “त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार” व महिला कार्यकर्ता मेळावा घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे उत्साहात पार पडला.nnकार्यक्रमाचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना “माता रमाई पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांनी माता रमाई यांच्या जीवनकार्यावर आधारित गीत, कविता सादर केल्या. मान्यवरांच्या भाषणांतून माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.nnकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंदनाताई गांगुर्डे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कोंकण प्रदेश अध्यक्ष विठ्ठलजी चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे यांनी केले. महिला आघाडी व युवक कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.nnमहिला सक्षमीकरणाच्या चर्चांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कर्तृत्वाला सन्मान देणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. माता रमाई आंबेडकर यांचे जीवन आजच्या पिढीसाठी संघर्ष, संयम आणि सामाजिक जाणीवेचे प्रतीक आहे. अशा कार्यक्रमांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो, तसेच सामाजिक चळवळींना नवी दिशा मिळते. पुरस्कार व मेळाव्याच्या माध्यमातून महिलांच्या कार्याची दखल घेणे ही काळाची गरज असून, राजकीय पक्षांनी असे उपक्रम सातत्याने राबवावेत, हीच अपेक्षा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *