August 6, 2026

उत्तर प्रदेशातील २ सराईत आरोपी जेरबंद; ११ गुन्ह्यांची उकल, ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

नाशिक : नाशिक शहर गुन्हे शाखा, युनिट क्र. २ यांनी केलेल्या कारवाईत उत्तर प्रदेशातील दोन सराईत आरोपींना अटक करून चैन स्नॅचिंग (जबरी चोरी) व मोटारसायकल चोरीचे एकूण ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.nnपोलीस आयुक्त संदीप कर्णिक व उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. अंबड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पंचवटी परिसरातील पांजरपोळ भिंतीलगत सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले.nnअटक करण्यात आलेल्या आरोपींची नावेnn१) शुभम विनोदकुमार मौर्य (वय २५, रा. उत्तर प्रदेश)nn२) स्वदेश उर्फ शिडू रामाशंकर मौर्य (वय २५, रा. उत्तर प्रदेश)nnचौकशीत आरोपींनी नाशिक शहरातील अंबड, इंदिरानगर, सातपूर, सरकारवाडा आणि गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत चैन स्नॅचिंग व मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीतील २ सोन्याच्या पोती, गुन्ह्यात वापरलेल्या २ मोटारसायकली आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.n

दोन्ही आरोपींविरुद्ध उत्तर प्रदेशातही चोरी व घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संबंधित गुन्ह्यांमध्ये पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्र. २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *