August 6, 2026

जळगावात दोन लोकसेवक लाच घेताना रंगेहात अटकेत; ३० हजारांची लाच स्वीकारताना कारवाई

0

जळगावात दोन लोकसेवक लाच घेताना रंगेहात अटकेत; ३० हजारांची लाच स्वीकारताना कारवाईnnनाशिक लोकल : जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत दोन लोकसेवकांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली.nnसदानंद व्यंकटी मुंडे (वय ३४, व्यवसाय नोकरी, रा. मुळगाव, ता. जि. जळगाव) आणि अभिजित नामदेव येवले (वय ३२, मंडळ अधिकारी, सजा मसावद, ता. जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.nnतक्रारदार हे वाळू वाहतूक व्यवसायाशी संबंधित असून, त्यांच्या डंपरवर कारवाई न करण्यासाठी आरोपींनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ३० हजार रुपयांवर व्यवहार ठरला. तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.nnतक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार सदानंद मुंडे यांनी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.nnकारवाईदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम तसेच मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.nnही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागरिकांनी लाच मागणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *