August 6, 2026

भुमिपुत्र सत्याग्रह स्मारक समितीच्या अध्यक्षपदी प्रसिध्द उद्योजक नारायण गायकवाड यांची निवड

0

नाशिक  लोकल प्रतिनिधी डि.एस : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या भुमिपुत्र सत्याग्रही स्मारक समितीच्या अध्यक्षपदी प्रसिध्द उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांनी निवड करण्यात आली असल्याची घोषणा समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्यावतीने करण्यात आली. बुधवारी (दि.११) कॅनडा कॉर्नरवरील वसंत मार्केटमधील विनीत कन्स्ट्रक्शन याठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.nnसमितीतर्फे २ मार्चरोजी संविधान सभेचे आयोजनnnडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सामाजिक समतेचा सत्याग्रह २ मार्च १९३० या दिवशी सुरू करण्यात आला. सामाजिक परिवर्तनाच्या या लढाईत सहभागी झालेल्या सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी भुमिपुत्र सत्याग्रही स्मारक समितीच्यावतीने येत्या २ मार्चरोजी सायंकाळी ७ वाजता गौरी पटांगण (श्रध्दा लॉन्ससमाेर) गाडगे महाराज पुलासमोर, गंगाघाट, पंचवटी, नाशिक याठिकाणी संविधान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेनंतर भीमगिते व प्रबोधनपर गीतांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण हे देखील या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे.nnअभिवादन सभेत माजी महापौर अशोक दिवे, आर.आर.पी. राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, नवनियुक्त महापौर हिमगौर आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, आ. देवयानी फरांछे, आ. राहुल ढिकले, आनंद सोनवणे, नगरसेवक राहुल दिवे, जागृती गांगुर्डे, वंचितचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, आरपीआय नेते संजय भालेराव, अर्जुन पगारे, सलमा गुरूमाऊली, शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे भिवानंद काळे, सनी रोकडे, कविता तेजाळे, नगरसेवक दिनकर पाटील, अविनाश शिंदे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी दामोदर पगारे, कार्याध्यक्षपदी आदेश पगारे,. मुख्य निमंत्रक कैलास तेलोरे व बिपीन कटारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व संविधानप्रेमी व लोकशाहीवादी जनतेने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष नारायण गायकवाड यांनी केले आहे.nn 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *