सगुणा फाऊंडेशन ग्रुप, नाशिक यांच्यातर्फे शिवजन्मोत्सव साजरा
सगुणा फाऊंडेशन ग्रुप, नाशिक यांच्यातर्फे शिवजन्मोत्सव साजरnnनाशिक प्रतिनिधी :nnसगुणा फाऊंडेशन ग्रुप नाशिक व पी. डी. गांगुर्डे सोशल ग्रुप नाशिक यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही रयतेचा राजा, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सवानिमित्त महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.nnया प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेश गांगुर्डे यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवक राहुल दिवे, प्रथमेश गिते, सिमाताई पवार, सचिन मराठे, अशाताई तडवी, जोतीअनिल जोधंळे व कमलेश बोडके यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.nnकार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद कुलकर्णी, पी. डी. काळे, शशिकांत उपासनी, नाना शिलेदार, कुणाल गायकवाड, बाळासाहेब जानमाळी, रमेश साळवे, डॉ. सुभाष काळे, दिनकर दाणी, गजुभाऊ घोडके, संजय मंडलिक, हिरामण काठे, ॲड. संजय खरे, संदीपभाऊ डोळस, योगेश नन्नवरे, वंदनाताई नागवंशी, भारतीताई शेलार, लताताई वाघ, भारतीताई पाटील, सुरेखाताई वाघ, भालचंद्र जाधव, अशोक जोशी, संजय देवरे, रविंद्र सोनोने, जयराम वाघ, विषालभाऊ पवार, संजय वानखेडे, नितीन काळे, संजय तेजाळे, आशिष चौरसिया, आबांदास बोराडे, शामदादा उपासनी, रविंद्र कुलकर्णी, बोरसे सर, बिहाडे साहेब, बाळुभाऊ सोनवणे, भुषण महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.nnकार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सेक्रेटरी दीपक कटारे व विजय अहिरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ शेळके, लभिब मुल्ला, अरुण भाऊ शहाकर, सुशील बर्वे, नाना तेजाळे, प्रवज्जा गांगुर्डे, मनीषा काळे आदींनी परिश्रम घेतले.
