सातपुर गोळीबार प्रकरणी ६ संशयित आरोपी अटकेत
गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी
नाशिक : सातपुर
सातपुर पोलीस हद्दीत पूर्व वैमनस्यातुन राहुल पवार व त्यांचा मित्र तपन जाधव यांच्यावर पिस्टलने गोळीबार करत व कोयत्याने गंभीर दुखापत करत जिवेठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना १९ मार्च २०२३ रोजी सातपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कार्बन नाका परिसरात घडली होती. या प्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातपूर व गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ६ संशयितांना अटक केली आहे.
गुन्हेशाखा युनिट क्र . १ नाशिक शहर विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत होता.
गुन्हयातील संशयित आरोपीतांचा शोध घेत असतांना दिनांक २५ मार्च २०२३ रोजी गुन्हात सहभागी असणारे संशयित आरोपी भुषण किसन पवार (वय २६ वर्षे रा. माउली निवास भाजीमार्केट जवळ, शिवाजीनगर) व रोहीत मंगलवास आहीरराव (वय २७ वर्षे रा. प्लॉट नं. ६, परफेक्ट हाइट्सय कोमल स्विटच्या मागे, शिवाजीनगर, नाशिक ) यांना ताब्यात घेण्यात आले होते. इतर संशयित आरोपीचा शोध घेत असतांना गुन्ह्यात सहभाग असणारा मुख्य संशयित आरोपी गणेश राजेंद्र जाधव (वय २६, रा. अमर ये हाऊस नं. ३, इंदिरागांधी शाळेसमोर, शिवाजी नगर नाशिक) यला द्वारका परिसरातुन ताब्यात घेतले. गुन्हयाचे पुढील तपास व कारवाई कामी सातपुर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. गुरुवारी (दि ३०) गुन्हयाचा मुख्य सुत्रधार संशयित आरोपी आशिष राजेंद्र जाधव व त्याचा साथीदार किरण दत्तात्रय चव्हाण हयांना धुळे येथुन युनिट १ च्या पथकाने ताब्यात घेतले.
पुढील कारवाईसाठी सातपुर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात दिले आहे.
गुन्हे शाखा युनिट क. १ पथकाने गुन्हा घडल्यापासून सतत अहोरात्र परिश्रम घेवुन गुन्हयाचा मुख्य सुत्रधार संशयित आशिष राजेंद्र जाधव त्यांचे ५ साथीदार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सातपुर पोलिसांनी सोमनाथ झांझर उर्फ सनी (वय २२, रा. सातपुर, ) यास घेतले.
पुढील तपास सातपुर पोलीस करत आहेत.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस अंमलदार रविंद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझिमखान पठाण, योगीराज गायकवाड, संदीप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, महेश साळुंके आगीच्या पथकाने केली.