नाशिक : जिल्हापरिषद
जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागाकडून जिल्हा कोषागारात तब्बल १४१ कोटींची देयके देण्यात आली. लोकप्रतिनिधी च्या स्थानिक विकास निधी व जिल्हा नियोजन समिती च्या कामांचाही समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागात शुक्रवारी (दि. ३१) बिले जमा करण्यासाठी ठेकेदारांची जिल्हा परिषदेत मोठी गर्दी झाली होती. लेखा विभागाने
रात्रीपर्यंत सुमारे १४१ कोटींची देयके जिल्हा कोषागारात (ट्रेझरी) जमा केली आहेत. देयके जमा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला नियमित नियतव्यय प्राप्त झाले. त्यानंतर निधी पुनर्नियोजनात निधी पदरात पाडून घेण्यासाठी यंदा लोकप्रतिनिधींमध्ये मोठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून आले. मात्र, ठरावीक आमदार वगळता अनेकांच्या पदरी निराशा पडल्याचे बोलले जात आहे.
पुनर्नियोजनात पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा
मंडळाकडून ३१ मार्चच्या अखेरच्या दिवशी आरोग्य, अंगणवाड्या, शिक्षणासह रस्त्यांसाठी भरघोस करून दिला आहे.
गत तीन दिवसात लेखा विभागाने १२५.५० कोटींची देयके जमा केलेली आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत देयके जमा करण्याची मुभा असल्याने देयके जमा करण्याचे काम हे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तसेच विकासकामांसाठी आणखी निधी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.