पुणे महामार्गावर २ एसटीच्या विचित्र अपघातात दोन दुचाकीस्वार ठार
नाशिक : पुणे- राजगुरुनगर बसस्थानकातून नाशिकच्या दिशेने सुटलेली महामंडळाची लाल परी बस शहराच्या वेशीवर पोहोचली असता पळसे गाव चौफुलीवर अचानकपणे बसचालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ही बस पुढे गावाच्या थांब्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या बसवर पाठीमागून भरधाव जाऊन आदळली. या दोन्ही बसेसच्या मध्ये दुचाकींवरून प्रवास करणाऱ्या तीन दुचाकीस्वारांना बसने चिरडले, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र विसे आणि मदन साबळे (रा. ता. अकोले) ही मृतांची नावे आहेत. ‘स्पार्किंग होऊन दुचाकींनी पेट घेतल्याने राजगुरूनगर बसदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यावेळी आजूबाजूच्या स्थानिक लोकांसह ग्रामस्थांनी धाव घेत बसच्या काचा फोडून, दरवाजा उघडून देत प्रवाशांना खाली सुखरूप उत्तरविले. यामुळे ४३ प्रवासी सुखरूप बचावले.
पुणे महामार्गावरून राज्य परिवहन महामंडळाची लाल परी बस (एमएच ०७ सी ७०८१) घेऊन बसचालक राजेंद्र अंबादास ऊईके है नाशिकच्या दिशेने जात होते. बसमध्ये महिला वाहक आशा शेळके यांच्यासह सुमारे ४५ प्रवासी पुणे नाशिक असा प्रवास करीत होते गुरुवार दिनांक 8 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मी बस नाशिक रोड पासून दोन किलोमीटर आधी पळसे गावाच्या चौफुलीवर घेऊन अपघात झाला या चौफुलीवर असलेले गतिरोधक ओलांडण्यासाठी बसचा वेग चालकाने कमी करण्याचा प्रयत्न केला असता बसचे ब्रेक फेल झाले यामुळे ही बस पळसे थांब्यावर उभ्या असलेल्या महामंडळाच्या ‘विठाई’ बसवर (एमएच १४ बीटी ३६३५) वेगात जाऊन आदळली. दरम्यान, या दोन बसेसच्या मध्ये रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या तिघा दुचाकींना एका बसची जोरदार धडक बसली. यामध्ये दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. जखमीस जवळच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने दोन दुचाकीचालकांचा होरपळून मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी बसखाली पुढच्या चाकाजवळ अडकून पडल्या. दुचाकींनी पेट घेतल्याने बसदेखील आगीच्या विळख्यात सापडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस, अग्निशमन दलाचे बंब, १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणाऱ्या चार रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
बसचा उरला सांगाडा; अनर्थ टळला!
लाल परी बस आगीत पूर्णपणे जळून भस्मसात झाली. यावेळी बसमधून महिला, पुरुष, मुले, मुली, बालके असे सुमारे ४३पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर आजूबाजूच्या लोकानी चळीच धाव घेत बसमधील प्रवाशांना जमेल तसे सुखरूप बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. अन्यथा ऑक्टोबरमध्ये येथील तपोवनाजवळ पहाटे खासगी बस जळीत दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
नाशिक पुणे महामार्गावर भीषण अपघात एसटी महामंडळाची बस जळून खाक
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!