HomeCrimeकापडणीस पिता-पुत्र खून प्रकरणात अॅड. निकम विशेष सरकारी वकील नाशिक :...

कापडणीस पिता-पुत्र खून प्रकरणात अॅड. निकम विशेष सरकारी वकील नाशिक : नाशिक शहर हादरून

 

नाशिक : शहर

नाशिक शहर हादरून सोडणाऱ्या कापडणीस पिता-पुत्र खूनखटल्याची नियमित सुनावणी मे महिन्यापासून सुरू होणार आहे. यासंदर्भात बुधवारी (ता. ५) सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांनी आपले वकीलपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले. त्याचप्रमाणे संशयितां तर्फेही त्यांच्या वकिलांनी वकिलपत्र दाखल केले आहे. फेब्रुवारी  २०२२ मध्ये मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस व त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांच्या दुहेरी खुन प्रकरण पोलिसांनी एका मिसिंग तक्रारी द्वारे उघडकीस आणले होते. संशयित राहुल जगताप याने कापडणीस यांची संपत्ती हडपण्यासाठी नियोजनबद्ध कट रचून बापलेकांची हत्त्या केली होती. या प्रकरणात गृह विभागाने अॅड. निकम यांची सरकारी पक्षातर्फे नियुक्ती करावी, अशी शिफारस नाशिक पोलिस आयुक्तालयाने केली होती. त्यानुसार गृह विभागाने आदेश निर्गमित केले. बुधवारी (ता. ५) अॅड. उज्ज्वल निकम नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर होत सरकार पक्षातर्फे वकीलपत्र दाखल केले. येत्या २१ एप्रिलला नियमित सुनावणीसाठीची तारीख दिली आहे. परंतु या खटल्याप्रकरणी युक्तिवाद मे महिन्यापासून सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांनी याप्रकरणी सोळाशे पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. मुख्य संशयित राहुल जगतापसह संशयित प्रदीप शिरसाठ, विकास हेमके आणि सूरज मोरे यांच्याविरूद्ध सबळ पुरावे पोलिसांनी कसोशीने तपास करीत संकलित केलेले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!