
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गेल्या गुरुवारी जाहीर झाला. आज शुक्रवार, २ जून रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. बोर्डाकडून परीक्षांच्या निकालांसंबंधी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. शिक्षकांनी पुकारलेल्या संपामुळे दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र संप मागे घेतल्यानंतर आता बारावी बोर्ड परीक्षा निकाल वेळेत जाहीर झाला. त्यामुळे दहावीचा निकाल देखील वेळेतच जाहीर होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १० वी ) परीक्षेचा निकाल आज २ जून दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
खालील वेबसाईटवर निकाल पाहता येईल
www.mahresult.nic.in www.hscresult.mkcl.org https://hsc.mahresults.org.in
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील. याची छापील प्रत (प्रिंट ऑऊट) घेता येतील. अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतरण प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय (http://verification./mh-hsc.ac.in)
मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने करता येईल