Homeसामाजिक कामनाशकात 17 डिसेंबरला बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट धम्म मेळावा

नाशकात 17 डिसेंबरला बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट धम्म मेळावा

नाशकात 17 डिसेंबरला बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट धम्म मेळावा
लाखांहून अधिक लोक उपस्थित राहणार
नाशिक- भारतीय बौद्ध महासभेतर्फे शनिवार दिनांक 17 डिसेंबरला गोल्फ क्लब ईतगा मैदानावर विराट धम्म मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून एक लाखांहून अधिक लोक उपस्थित राहतील,अशी माहिती आयोजक भारतीय बैध्द महासभा नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रवीण बागुल तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार आणि महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिली.
धम्म मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख सल्लागार ॲड.बाळासाहेब आंबेडकर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, अंजली ताई आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर , अशोक सोनवणे, राजेंद्र पतोडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंकीताई शेख, मोहनभाऊ अढांगळे,वामनदादा गायकवाड, जगदीश गवई,एस के भंडारे,ॲड एस.एस.वानखेडे,भिकाजी कांबळे, देवशाला गायकवाड,संबोधी सोनकांबळे,प्रभाकर नांदेडकर, उपस्थित राहणार असून या सर्वांचे विचार ऐकण्याची नामी संधी उपस्थितांना प्राप्त होणार असल्याने या धम्म मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
बौद्धांचा दर्जा,त्यांचे अधिकार, संरक्षण,त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सवलती तसेच धम्म दीक्षेसाठी धम्म स्वातंत्र्य अबाधित राहावे यासह विविध विषयांवर मेळाव्यात उहापोह होणार आहे.
मेळावा यशस्वी करण्यास गौतम पवार,राजू जगताप,सतीश गांगुर्डे, मनोज गाडे,जयवंत निकम,संजय भोसले,प्रकाश जगताप,अरुण शिंदे, शोभाताई कटारे,रत्नाकर साळवे, हिरामण अहिरे,चावदास भालेराव, कृष्णा सोनवणे,विनोद शिंदे,नूतन साळवे,सुरेखा लोखंडे,उर्मिलाताई गायकवाड,संजय साबळे,बाळासाहेब शिंदे,दीपचंद दोंदे,जितेश शार्दुल, संजय दोंदे,बाळासाहेब जाधव,अनिल आठवले,बाळासाहेब गांगुर्डे,रमेश गवळी,विक्रम जगताप,प्रवीण जाधव, संदीप काकळीज,प्रकाश राऊत,महेश भोसले,विलास गुंजाळ,अजय साळवे आदी प्रयत्नशील आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन पवन भाऊ पवार व अविनाश शिंदे यांनी केले

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!