HomeUncategorizedमनोज गरबडे याचे राजगृहावर अभिनंदन: देशात लाखों सैनिकांची फौज उभारणार -...

मनोज गरबडे याचे राजगृहावर अभिनंदन: देशात लाखों सैनिकांची फौज उभारणार – भीमराव आंबेडकर

मुंबई-१८-(प्रतिनिधी) भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल पुणे समता सैनिक दलाचे मनोज गरबडे याने शाई फेक केली होती,त्यांना जामीन मिळाल्यानंतर दादर चैत्यभूमी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष , समता सौनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर यांची रात्री राजगृह येथे भेट घेतली़,आंबेडकर यांनी यावेळी मनोज गरबडे आणि त्यांचे सहका-यांचे अभिनंदन केले.सदर प्रसंगी समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे ,महाराष्ट्राचे सरचिटणीस सुशील वाघमारे उपस्थित होते.चैत्यभूमीवर त्याना समता सैनिक दलाची टोपी समता सैनिक दलाचे मेजर जनरल व चैत्यभूमी चे व्यवस्थापक प्रदिप कांबळे यांनी परिधान केली. मनोज गरबडे यांनी समता सैनिक दलाचे काम भीमराव आंबेडकर यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि शाई फेक करणाऱ्या मनोज आणि इतरांवर लावलेले 307,120 कलमे रद्द करण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाने केली होती.
डॉ भीमराव य आंबेडकर यांनी ,भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे रक्षण व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करण्यासाठी देशभर लाखों समता सैनिक दलाची फौज उभारणार असून त्यासाठी एक दिवसांची शिबिरे धम्म चक्र प्रवर्तन दिन -5ऑक्टोबर पासून सुरू केली असल्याचे सांगून समता सैनिक दलामध्ये तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन केल्याचे एस के भंडारे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!