August 7, 2026

वाघ खुनाचे मारेकरी सापडले, अवैध धंद्यांचे आका कधी सापडतील

0

नाशिक रोड : प्रतिनीधी  : नाशिक रोड सिन्नर फाटा येथे जागेच्या वादातून खून झाला. प्रमोद केरू वाघ याचा खून झाला. नाशिक पोलिसांनी काही तासात गुन्हेगारांचा तपासही केला सद्दाम मलिकला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेत प्रमोदला अमानुषपणे मारहाण करून त्याला जागीच ठार मारले आहे. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपीला बेड्या ठोकल्या असे प्रसारमाध्यमांना सांगितले असले तरी नाशिक शहरातले गुन्हे कमी होताना दिसत नाहीत. शहरात अवैध धंदे सुसाट पणे चालू आहेत. रोलेट सह गॅम्बलिंग महिला देहविक्री स्टील चोरी एमडी ड्रग्स सारखा अतिशय घातक मादक पदार्थ विक्री नाशिक शहरात बिन बोभाटपणे सुरू आहे. नाशिक पोलीस यावर प्रतिबंध का करत नाहीत असा जनसामान्यांचा सवाल आहे. पत्रकारांनी काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्यास पोलीस पत्रकारांकडे पुरावे मागतात पुरावे संकलन करणाऱ्या पत्रकारांवर खंडणीचे गुन्हे दाखल करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. सरकारने पोलिसांना अधिकार दिलेत त्याप्रमाणे पत्रकारांना अधिकार द्या म्हणजे ते त्या अवैद्य धंद्याचा व्हिडिओ करून पोलिसांना पुरावे देतील. घटनेचा पडदा पास करण्यास हरकत राहणार नाही. नाशिक शहरातील अवैद्य धंदे हद्दपार झाले पाहिजे या भूमिकेत आता नाशिककर आहेत हे पोलिसांनी लक्षात घेतले पाहिजे यावर कठोर कारवाई झाली नाही तर नक्कीच जनआंदोलन उभे राहील यात शंका नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *