August 8, 2026

प्रत्येक ठिकाणी मतांचे गणित बांधायचे नसते- संजय केळकर

0

प्रत्येक ठिकाणी मतांचे गणित बांधायचे नसते- संजय केळकरnnठाणे : पुण्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे दाखवण्यात आले होते. यावेळी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना अध्यक्ष राम रेपाळे, श्रीमती लता पाटील, सदस्य भरत चव्हाण, वनिता गोतपगार, अरुणा पेंढारे, सुवर्णा खिल्लारी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आदी मान्यवरांसह लाभार्थी महिला  उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरणासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी दिली आहे. तसेच ही योजना क्रांतीकारी योजना आहे आणि ठाणे जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक अर्ज दाखल करण्यात आले आहे व साडे तीन लाख महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत. विरोधकांनी कधी काही दिले नाही म्हणून ते कोणता ना कोणता विषय काढतात, प्रत्येक ठिकाणी मतांचे गणित बांधायचे नसते अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार संजय केळकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *