बम बम भोलेच्या गजरात नांदेरमध्ये कावड यात्रा संपन्न
नांदेड : राम जन्मोत्सव समिती तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मासानिमित्त काळेश्वर मंदिर ते सोमेश्वर मंदिर इथपर्यंत कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते -या कावड यात्रेमध्ये आयोजकामार्फत विविध देखावे तसेच शिवभक्त व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरावर अनेक भाविक भक्तांनी डमरू वाजून नृत्य सादर केले. हे पाहण्यासाठी अनेक भाविक भक्तांनी गर्दी केली होती
