इंदिरानगर पोलीस ठाणाच्या १४ बेवारस दुचाकींचा उद्या होणार लिलाव*
नाशिक : वार्ताहरnइंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील बेवारस स्थितीत जमा करण्यात आलेल्या चौदा दुचाकी़चा लिलाव इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या करण्यात येणार असल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांनी दिली . दुचाकी च्या लिलावास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट 3, नाशिक व पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, नाशिक शहर यांची रितसर परवानगी घेण्यात आली आहे. सरकारी नियमाप्रमाणे व १४ वाहनांचा लिलाव उद्या शुक्रवारी (दि १०)सकाळी ११ वाजता करण्यात येणार असून लिलाव घेणाऱ्या व्यावसायिकांनी याची नोंद घ्यावी, असेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांनी कळविले आहे.
