दिंडोरी तालुक्यातील रामशेज आशेवाडी येथील ग्रामसेवक श्रावण वामन वाकचौरे याला 600 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारदार यांच्या मयत आईची मृत्यूची नोंद ग्रामपंचायत कार्यालय येथे करून प्रमाणपत्र बनवून देतो असे श्रावण वामन वाकचौरे यांनी तक्रारदारास सांगितले होते. या प्रमाणपत्र बदल्यात त्यांनी तक्रारदारांकडून 600 रुपये मागितल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर तक्रारदाराकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार लेखी लिहून घेतली होती दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचून या लाचखोर ग्रामसेवकाकडून सहाशे रुपये रोख रक्कम लाचकोटी स्वीकारताना पोलिसांनी अटक केली आहे त्याला रंगेहात पकडण्यात आले या लाचखोर ग्रामसेवक श्रावण वामन वाघचौरे याचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधन अधिनियम 1988 चे कलम सात प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालवलकर नाशिक परिक्षेत्र नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा आदमाने करीत आहेत. जनतेस आव्हान आपल्याकडे जर कोणी पैशाची मागणी करीत असेल तर लाज लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा मोबाईल क्रमांक 1034 तसेच नाशिक विभागासाठी 0253 2575628, 2575230 अहमदनगर साठी दूरध्वनी क्रमांक 02412423677 धुळे विभागासाठी शून्य 02562234020 नंदुरबार साठी 02564230009 जळगाव विभागासाठी 02572235477 या क्रमांकावर ती संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!