August 7, 2026

अमृता पवार यांचा भाजप प्रवेश

0

राष्ट्रवादीला नाशिक मध्ये मोठे खिंडारnराष्ट्रवादीचे माजी खासदार डॉक्टर वसंतराव पवार व मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकच्या माजी संचालिका नीलिमाताई पवार यांच्या कन्या अमृता पवार यांनी आज मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये लाखो कार्यकर्त्यांसह जाहीर पक्ष प्रवेश केला.nभारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आज अमृता पवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.nत्यावेळेस बोलताना उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस म्हणाले की इतक्या वर्षाने अमृता पवार पक्षामध्ये आल्या आम्ही बराच वर्षांपासून त्यांच्या मागे होतो त्या अगोदर आल्या असत्या तर चित्र काही वेगळं बघावयास मिळाला असतं पण त्या आता पक्षात आल्यानं मला अतिशय आनंद होत आहे त्यांच्या येण्यान फार मोठा फायदा नाशिक जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये होणार आहे यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही असेही फडणवीस बोलताना म्हणाले अमृता पवार या भाजपमध्ये आल्याने निश्चितच भाजपची नाशिक मधील ताकद वाढेल व एक नव्याने नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीचे काम सुरू होईल या वेळी बोलताना अमृता पवार यांनी सांगितले की हा जो प्रवेश आम्ही केला आहे खरं तर मी ज्या पक्षातून येते या पक्षाची स्थापना डॉक्टर वसंत पवार यांनी नाशिकमध्ये प्रथम केली होती माजी पालकमंत्री यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही हा पक्ष प्रवेश करत आहे एका बाजूला त्यांचा भ्रष्टाचार हे पाहता भाजपामध्ये विकासाचं राजकारण असून देशाला एका वेगळ्या उंचीवर भारतीय जनता पार्टी घेऊन जात आहे यामुळेच पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यात आला असेही अमृता पवार यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार राहुल ढिकले यांसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *