August 7, 2026

शहर व ग्रामीण ३७ पोलिसांना उपनिरीक्षक पदोन्नती

0

शहर व ग्रामीण ३७ पोलिसांना उपनिरीक्षक पदोन्नतीnनाशिक : शहर/ जिल्हाnगृहविभागाने ३९७ पोलिस कर्मचाऱ्यांना नि:शस्त्र पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती दिली आहे. नाशिक ग्रामीणच्या २४ व नाशिक शहराच्या १३ कर्मचारी आहे. पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करुन त्यांच्याकडून नियुक्तीसंदर्भातील बंधपत्र प्राप्त करुन घेण्याच्या सूचना अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) संजीवकुमार सिंघल यांनी दिल्या आहेत. विभागीय महसूल संवर्गनिहाय नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण १, कोकण २, नाशिक व पुणे येथे नि:शस्त्र पोलिस उपनिरीक्षकांची ३००४ पदे रिक्त आहेत. नाशिक प्रशिक्षण केंद्रातील ५४७ प्रशिक्षणार्थी वगळून उर्वरित २४५७ रिक्त पदांवर सदर कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे.nपदोन्नतीस पात्र असलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, पोलिस नाईक दर्जाच्या कर्मचाऱ्यांची यादी मंगळवारी जाहीर झाली आहे.nnनाशिक शहर : शिवदास बाबुराव निकम, सूर्यकांत भिवसन सोनवणे, संजय तुकाराम मोहिते, मनोज हरिभाऊ विसे, केशव निवृत्ती आडके, दत्तात्रय दगू चव्हाणके, पोपट वामन माळोदे, मुनिरुद्दीन अलुद्दीन काझी, मंगेश भागवत कर्डिले, वाळू शिवराम लभडे, नंदू भाऊराव देशमुख, अनिल दिघोळे, इम्तियाज अली नवाजुद्दीन सय्यद आदीnn*ग्रामीण पोलिस दल* : कैलास त्र्यंबक खैरनार, महेमूद अश्रफ सय्यद, माणिक श्रीपाद देशमुख, सुनील राजाराम मोरे, इकलाख गफ्फार सय्यद, सुनील सोमगीर विधाते, बावा, सुनील बलराम गिते, लक्ष्मण सोमनाथ कुलकर्णी, श्यामराव बाबूराव गडाख, संजय तुकाराम सुकदेव संजय मुरकुटे, शिवाजी गोविंद जुन्नरे, दिपक पांडुरंग दोंदे, मखाराम दौलत राठोड, यलप्पा सटवा खैरे, गणेश भास्कर देवरे, शिवाजी कारभारी गुंजाळ, संजीव बाबू पाटील, नितीन रामनाथ मंडलिक, बबन दगू सोनवणे, रवींद्र विश्वनाथ भागवत, रवींद्र बाबूराव वानखेडे, गोविंद दत्तू चौधरी, सुनील उत्तमराव जाधव आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *