नाशिकरोड | पीआरपी राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, कार्यअध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या आदेशानुसार आज ‘2 मार्च 1930 साली झालेल्या ऐतिहासिक काळाराम मंदिर प्रवेश संग्राम दिनाचा’ वर्धापन दिन नाशिक, जेलरोड येथे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या उपस्थितीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि सत्याग्रहींना अभिवादन करून संपन्न झाला. तसेच गणेशभाई उन्हवणे यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि सत्याग्रहींच्या आठवणींना उजाळा दिला. दादासाहेबांनी हा लढा अनेक वर्ष चालवून लढ्याने आंबेडकरी चळवळीची ताकत वाढविली आणि ज्या मंदिरात शूद्र म्हणवून हिणवले गेलेला वर्ग आणि देवाला सुद्धा पीडित समाजाची जर काळजी नाही मग का म्हणून आपण अश्या देवाकडे गेले पाहिजे,म्हणून ह्या आदोलणातून आपण बोध घ्यावा आणि पुढील तेथील कर्मकांड करणाऱ्यांना बाबासाहेबांनी कडेलोट करून हे आंदोलन यशस्वी केले,असे यावेळी गणेशभाई उन्हवणे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले
यावेळी पीआरपी नाशिक जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे आणि ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर, भागवत डोळस,राज निकाळे, रवी पगारे रवी, जावेद शेख, नवनाथ कातकडे, शरद सोनवणे, भारत कर्डक, आबिद शेख, शाहरुख खान, मोबिन खान, हारून टकारी, मुरली कोळे, रफिक टकारी,शादाब शेख, देविदास पवार, शरद सोनवणे, प्रशांत कर्डक, गोविंद शिंगारे, सुनीता कर्डक, मीनाताई पगारे, संगीता वाघ, लक्ष्मी गडगडे, अल्का निकम, ज्योती, आहिरे, रोशनी बन्सी आदी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2 मार्च ‘मंदिर प्रवेश संग्राम दिनी’ महामानवास पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन!
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!