August 8, 2026

चार लोखंडी कोयते आणि दोन तलवारी जप्त

0

नाशिक : शहरnnसोमवारी (ता. (१७) रात्रीपासून मंगळवारी (ता. १८) पहाटेपर्यंत शहर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करीत चार लोखंडी कोयते आणि दोन तलवारी जप्त केले आहेत. पंचवटी कुमावतनगरमध्ये मंगळवारी पहाटे पंचवटी पोलिसांनी एकाला लोखंडी कोयत्यासह अटक केली. योगेश दत्त क्षीरसागर (३४), असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर येथील कार्बन नाका परिसरातून राहील  नुरुद्दीन सय्यद (१९, रा. दत्तमंदिर चौक, रुपय शिवाजीनगर, सातपूर) यास सोमवारी कारव रात्री पावणेबाराच्या सुमारास लोखंडी कोयत्यासह सातपूर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी सातपूर पोलिसात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगर परिसरातील रोकडोबावाडी  पुलाजवळ दोघांना कोयत्यासह अटक  केली. गोविंदा संजय साबळे (२२, रा. निकेश भोर मळा, जुना ओढा रोड, नाशिक  रोड), निरन ऊर्फ नर्या ऊर्फ नरेश नागू नरोटे (२०, रा. अरिंगळे मळा, एकलहरे केलेल रोड) असे दोघा संशयितांची नावे असून  दोघांच्या अंगझडतीतून दोन कोयत्यासह कारवा त्यांची दुचाकी असा ६० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई मळवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास दरोडा व शस्त्रविरोधी पोलिस पथकाने पोलिसानी या उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे मनगाव कॉलनीत पोलिसांनी दोघा सशयितांकडून दोन तलवारी जप्त केल्या. निकेश जाधव(३३), आतिश शांताराम चौधरी (१९, दोघे रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड), असे अटककेलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.नाशिक रोड पोलिसांनी मंगळवारी सदर कारवाई करीत दोघांविरुद्ध गुन्हे दाखलकेले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *