August 9, 2026

जन्मदात्या बापानेच मुलीचा गळा आवळून खून

0

नाशिक : जिल्हाnnमुलीच्या प्रेमप्रकरणाने समाजात बदनामी झाल्याच्या कारणातून जन्मदात्या बापानेच मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना लखमापूर (ता. बागलाण) येथे घडली आहे. साक्षी अनिल ठाकरे (वय १७) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात संशयित बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.nnलखमापूर येथील साक्षी ठाकरे हिचे सहा महिन्यापासून चिंचावड (ता. मालेगाव) येथील रोशन बच्छाव यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसापूर्वीच साक्षी ही आपल्या घरच्यांना काही न सांगता रोशन यांच्या घरी दोन वेळेस जाऊन आली होती. या घटनेची माहिती साक्षी हिचे वडील अनिल ठाकरे यांना समजली. या प्रकाराची नातेवाईक व समाजात बदनामी झाल्याचा राग अनिल ठाकरे यांना आल्याने त्यांनी १८ एप्रिलला दुपारी साडेपाचला साक्षी हिचा गळा आवळून ठार मारले. त्यानंतर साक्षी हिस वीजेचा शॉक बसल्याचे सांगितले. तसेच गळ्यावरील व्रण दिसू नये म्हणून त्यावर पावडर टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रकार केला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस उपअधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी सटाणा घटनास्थळी पोचून मृतदेह ताब्यात घेत संशयित अनिल ठाकरे यास अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे, पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार योगेंद्र सिसोदे, हेमंत कदम, अतुल आहेर तपास करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *