August 9, 2026

पंधराशेची लाच घेतांना सिनीयर टेक्नीशियन व खाजगी आसपास अटक

0

nजामनेर : जळगावnnतक्रारदार हे तोरनाळे ता.जामनेर येथील मुळ रहीवासी असून ते सध्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्तक्रारदार यांना तोरनाळे ता.जामनेर या त्यांच्या मुळगावी तोरनाळे ता.जामनेर ग्रामपंचायतीच्या त्यांच्या वडीलांच्या नावे असलेल्या बखळ जागी त्यांनी तयार केलेल्या पत्र्यांच्या शेडमध्ये विज मीटरचे नविन कनेक्शन घ्यायचे होते. तक्रारदार म.रा.वि.वि.कंपनी लि.फत्तेपूर कार्यालयात जावून विज मीटरचे नविन कनेक्शन मिळणेसाठी विचारपुस केली असता. सदर कार्यालयातील कर्मचारी सिनीयर टेक्नीशियन विनोद पवार व खाजगी इसम कलीम तडवी यांनी तक्रारदार यांना विज मीटरचे नविन कनेक्शन मिळणेसाठी ज्यांच्या नावे कनेक्शन घ्यायचे आहे . आधारकार्ड, ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला, १००/- रुपयांचा स्टॅम्प पेपर व डिमांडनोट,nएकुण ३ हजार ५००/- रुपये लागतील असे सांगितले . त्याचवेळी डिमांडनोट भरणेसाठी तक्रारदार यांचेकडून २ दोन हजार रुपये घेतलेले होते. व आज विज मीटरचे नविन कनेक्शन जोडणीसाठी क्रं.१ सिनीयर टेक्नीशियनnविनोद उत्तम पवार ( वय-३२ म.रा.वि.वि.कंपनी लि.फत्तेपूर ता.जामनेर, जि.जळगाव वर्ग-३)nव २ खाजगी इसम कलिम सलीम तडवी (वय-२७ , रा.देऊळगाव, ता.जामनेर जि.जळगाव)nयांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष साहेबांचे नावाने उर्वरीत पंधराशे रुपयांची लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः आलोसे क्रं.१ यांनी फत्तेपूर गावातील बुलढाणा ते जामनेर रोडवरील बुलढाणा अर्बन बँकेच्या शेजारील बंद दुकानाजवळ स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही आरोपीतांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.nसापळा व तपास अधिकारी पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव शशिकांत पाटील,पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदीच्या पथकाने केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *