चोरटयांना दोन वर्षाची शिक्षा
nnनाशिक : शहर
nnदामोदर चौकाकडून पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या मंगला रमाकांत शिरोडे यांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या योगेश कडाळे (२०, रा. तानाजी चौक, सिडको) व विशाल आवारे (१९, रा.बडदे कडाळे चाळ, शिवाजी चौक, सिडको) यांना प्रथमवर्ग न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मंगला रमाकांत शिरोडे (६५, रा.निजामपूर, ता.साकरी, जि.धुळे) यांचे मंगळसूत्र ८ मे, २०१७ रोजीदुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट एकचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक डी.व्ही. गिरमे यांनी तपास करून, योगेश व विशाल आवारे यांच्याविरोधात प्रथमवर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात मंगळवारी (दि.१६) न्यायाधीश जी.एम. कोल्हापुरे यांनी निकाल देताना दोन्ही आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे
