रविवार कारंजा मंदिरातील चोरटयास शिताफीने पकडणाऱ्या पोलिस पथकांचा पोलिस आयुक्तांकडून सन्मान
nnनाशिक : शहरnnरविवार कारंजा नाशिक येथील प्रसिध्द चांदीचा गणपती मंदिरातील चोरी करून मंदिराच्या सुरक्षा रक्षकास गंभीर जखमी करणा-या इसमास पाठलाग करून मुद्देमालासह सरकार वाडा पोलिस पथकाने संशयितास पकडले.nसदरच्या उल्लेखनिय कामगिरीबाबत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी उत्कृष्ट कामगिरी करणारे पथकास प्रशस्तीपत्र देवून गौरव केला आहे.nरविवारी (दि १६) मध्यरात्रीच्या सुमारास रविवार कारंजा नाशिक येथील प्रसिध्द चांदीचा गणपती येथील गणपती मुर्तीच्या अंगावरील दागिणे चोरी करण्यासाठी संशयित चोरट्याने सुरक्षारक्षकास मारहाण करत मंदिराच्या मुख्य दरवाज्याची काच फोडत मंदिरात प्रवेश करून गणपती मुर्तीवरील चांदीचे दोन हार चोरी करून संशयित फरार झाला. ज सराफ बाजार पोलीस चौकीचे हवालदार अहिरे व शिपाई गिरी यांनी गंगावाडी परिसरातुन पळून जात असलेल्या इसमाचा पाठलाग केला. सदर चोरटयाने गोदावरी नदीमध्ये उडी टाकली. पोहवा अहिरे यांनी रात्रगस्त अधिकारी यतीन पाटील यांना माहिती दिली .nपथकाने नदी परिसरात शोध घेतला असता एक इसम नदीपात्रातून बाहेर येताना दिसला त्यास त्याचा पाठलाग करून पकडले. निहाल उदयभान यादव (वय २१ वर्षे रा. अमृत दृग्धालय सरदार चौक पंचवटी मूळ रा. गाव रमपुरा, पो. मिहोनी, ता. लहार, जि. भिण्ड मध्यप्रदेश ) असे सांगीतले . अंगझडती घेतली असता त्याचेकडे त्याने रविवार कारंजा येथील गणपती मंदिरामध्ये चोरी केलेले दागिणे मिळून आले.nnसदर इसमाचे विरोधात सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक गुन्हा दाखल करण्यात आला . गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सरकारवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे हे करीत आहे.nपोलिस उपआयुक्त परिमंडळ १ किरणकुमार चव्हाण,सहा पोलिस आयुक्त सरकारवाडा विभाग सिध्देश्वर धुमाळ , सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलिस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक यतीन पाटील, पोहवा / शामराव अहिरे, पोना / नितीन थेटे, पोशि/ नाझीम शेख, पोशि/ बालाजी गिरी, पोशि/ विश्वजित राणे, पोशि/ संदिप सावळे, पोशि/पवन पगारे, चापोशि/रविंद्र पठारे आदीचा सन्मान आला .
