परप्रांतीय आहे म्हणून आजच्या काही पदाधिकाऱ्यांकडून आपल्याच कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे योगेश कापसे अमर गांगुर्डे प्रदीप लोखंडे हे नाशिक आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आहेत अमर गांगुर्डे आम आदमी युवा आघाडीचे अध्यक्ष असून या यांनी योगेश कापसे यांना घरी जाऊन घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे यासंदर्भात पोलीस स्टेशनला nc दाखल करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टी सध्या महाराष्ट्रात आपला पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. नाशिक मधले कार्यकर्ते अक्षरशा लोकांच्या घरात जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेतात. आम आदमी पार्टीचे ध्येय धोरण समजावून सांगतात हम आपको बिजली पानी फ्री देंगे जैसा हमने दिल्ली मे किया है पैसाही महाराष्ट्र मे करेंगे. मात्र आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये दोस्त चालू असल्याचे या मारहाणी वरून नाशिक मध्ये बोललं जात आहे.
जनतेने आम आदमी पार्टी ही अतिशय वेगळ्या धाटणीची पार्टी असून, देशाची व्यवस्था, “व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईच्या माध्यमातून” बदलतील आणि आम्ही विवेकाने वागत, राजकारणाची जी दशा झाली आहे, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न करू,अशी अपेक्षा केली होती.
तसेच जनतेने, विवेकी, सकारात्मक आणि अत्युच्च विचारांच्या लोकांची ही पार्टी असून, इतर पक्षांसारखी गुंडा गर्दी मारामारी आणि दोन नंबरचे पैसे कमवण्याचे प्रयत्न आणि त्यातून देशाची संपत्ती लुटण्याचे प्रकार, होणार नाहीत. तसेच नीतिमान अशी राजकीय कारकीर्दही करू, असा विश्वास देणाऱ्या लोकांची ही पार्टी आहे, याची खात्री मनोमन बाळगली होती.
अरविंद केजरीवालजींच्या वागण्या बोलण्यावरूनही व दिल्ली अन् पंजाबच्या यशावरूनही सर्वांना वेळोवेळी ही खात्रीही पटत होती. अरविंद केजरीवालांच्या धोरणानुसार, अपेक्षेनुसार आणि उद्दिष्टानुसार सगळे कार्यकर्ते काम करणारे असतील. कोणीही अविवेकानं वागणार नाहीत. आपसात वैचारिक मतभेद असू शकतील, पण आपापसात मारामाऱ्या करण्यापर्यंत, कोणीही जाणारच नाही, याचीही त्यांनी अपेक्षा ठेवली होती. खरे तर ही अपेक्षा सुद्धा अतिशय योग्य अशीच होती. मात्र नाशिकमध्ये मारहाण झाल्या प्रकरणी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये nc देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केले आहे.
ही निंदनीय आणि निषेधार्ह गुंडागर्दी आणि मारहाण,भारतीय जनतेला त्यांच्या स्वप्नांना, मनाला,विचारांना, विवेकाला,आशा अन् अपेक्षांना धुळीत मिळवणारी आहे. पक्षातील अशा उपद्रवी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या वागण्याने, झालेल्या अशा अक्षम्य कृतीबद्दल, आम्ही आम आदमी पक्षाचे सगळे, तमाम जनतेची मनःपूर्वक क्षमा मागतो. माफी मागतो. असे विधान आमचे कार्यकर्ते जितेंद्र भावे यांनी व्यक्त केले आहे. पक्षांतर्गत या तिघांवर कारवाई करावी अशी अपेक्षा जितेंद्र भावे व टिंब व्यक्त केले आहे.
आम आदमी पार्टीच्या समन्वयाला नाशिकमध्ये आपल्याच पार्टीच्या लोकांकडून मारहाण.
Recent Comments
on Hello world!