August 9, 2026

७ हजारांची लाच घेतांना सहाय्यक निरीक्षक अटकेत

0

नाशिक : तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपास कामी पुणे येथे जाण्यासाठी लागणाऱ्या खाजगी वाहनाचा खर्च व जेवणाच्या खर्चासाठी , तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी करून 7 हजार रुपये लाचेची रक्कमnस्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षकnसागर गंगाराम डगळे (वय 38 वर्ष. पद सहाय्यक पोलीस निरीक्षक (वर्ग- 2) उपनगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर)nरंगेहात पकडण्यात आले आहे. विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते .पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे,nपोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पो. ना. किरण अहिरराव, पो. ना.अजय गरुड पो.ना. चंद्रशेखर मोरेnलाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *