HomeCrimeमसाज पार्लर च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणार्‍या कारवाई

मसाज पार्लर च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणार्‍या कारवाई

नाशिक : वार्ताहर

शरणपुर रोड सुयोजीत मॉर्डन पॉईट या बिल्डींगमध्ये मसाला पानावरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणार्‍या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली.
पी. सी. बी. एम. ओ.बी मध्यवर्ती गुन्हेशाखा शाखेकडील प उपनिरीक्षक सुनिल माळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे , शरणपुर रोड सुयोजीत मॉर्डन पॉईट या बिल्डींगमध्ये संशयित अनेश अरूण उन्हवणे (रा. उपनगर ) याने दोन गाळे भाडयाने घेवुन त्या ठिकाणी योग वेलनेस स्पा नावाने मसाज पार्लर सुरू करून सदर ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याबाबत माहिती मिळाली होती.

मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस उपआयुक्त (गुन्हे), प्रशांत बच्छाव , सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हेशाखा डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
, योग वेलनेस स्पा, सुयोजीत मॉर्डन पॉईट बिल्डींग, शरणपुर रोड नाशिक येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री झाल्याने छापा पथकाने सदर ठिकाणी छापा कारवाई करून मसाज पार्लरच्या नावाखाली एक संशयित महिला व संशयित ललित पांडुरंग राठोड हे महिलांना पैशांचे प्रलोभन देवुन त्यांचेकडुन अनैतिक देहव्यापाराचा व्यवसाय करून घेतांना मसाज पार्लरमध्ये
सहा पिडीत महिला मिळुन आल्याने त्यांची सुटका करण्यात आली.
स्वत:चे आर्थीक फायदयासाठी पिडीत महिलांना पैशांचे प्रलोभन देवून सदर पिडीत महिलांकडुन देहविक्री करुन घेण्याकरीता फरार इसम ३) अनेश अरुण उन्हवणे याने गाळा मालक इसम नामे ४) सागर ओमकार अग्रवाल ५) पियुष ओमकार अग्रवाल यांचेकडुन गाळा भाडे तत्वावर घेवुन त्यांना उपलब्ध करून देवून सर्वांनी संगनमताने स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता सदर पिडीत महिला यांचेकडून मसाज पार्लरच्या नावाखाली देहव्यापार करुन घेतांना मिळुन आलेले असल्याने त्यांचेविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुरनं. ४९/२०२३ अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाणेकडील अधिकारी करीत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!