पंचवटी खुन प्रकरणी तिघे ताब्यात
नाशिक : वार्ताहर
पंचवटी येथे सोमवारी (दि६) मध्यरात्री च्या सुमारास
किरण किरण गुंजाळ यांच्या हल्ला करत खुन करण्यात आला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दोन तासात शिताफीने तीन संशयितांना अटक केल्याची माहिती परीमडळ १ चे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.
याबाबत माहिती देताना पोलीस उप आयुक्त चव्हाण यांनी सांगितले की,पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, . रणजित नलावडे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) त्याप्रमाणे पंचवटी ठाणेचे गुन्हे शोध पथकाने मानवी कौशल्याचा वापर करून तसेच तांत्रीक विश्लेषन शाखा याची मदत घेवुन या खुनाच्या क्लिष्ट गुन्हयाची ०२ तासात उकल केली. संशयित नितीन पांडुरंग साबळे, ( वय-२१, रा. शनिमंदीर मागे, पेठरोड, पंचवटी, नाशिक ), देवा उत्तम पाटील (वय-२२, रा. राजवाडा, पंचवटी, निमाणी समोर, नाशिक) , दिपक रामान्ना वर्धे, (वय-२३, रा. गजानन चौक, कौमटी गल्ली, पंचवटी, नाशिक) यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे या गुन्हयाबाबत तपास केला . मयत किरण गुंजाळ व संशयित आरोपी यांच्यात भाजी मार्केट मध्ये काम करीत असतांना त्यांच्यात किरकोळ वाद झाले होते. असाच वाद सोमवारी ६ रोजी सायंकाळच्या सुमारास मयत व संशयित यांच्या मध्ये किरकोळ वाद झाला. या वादातुन संशयितांनी यांनी त्यांचे कडेस असलेल्या चाकुने मयताचे गळयावर व पोटात वार करून जिवे ठार मारुन पळुन गेले . तिन्ही संशयितांना या गुन्हयात अटक करण्यात आली. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस . निरीक्षक. रणजित नलावडे हे करीत आहे.
गुंजाळ आणि संशयित यांच्यामध्ये निश्चित कोणत्या कारणावरून वाद झाला हे शोधण्याचे काम सुरू आहे . विना नंबरची रिक्षा वापरली आहे तिचा देखील शोध सुरू आहे.