कामाला लावून देतो म्हणून सात लाख पन्नास हजाराची फसवणूक .
रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो असे सांगून तब्बल सात लाख पन्नास हजार रुपयाची फसवणूक केल्या असल्याची तक्रार आडगाव पोलसात दाखल करण्यात आले आहे. राजकुमार मधुकर सानप राहणार येवला रोड नांदगाव नाशिक यांची संशयित आरोपी महादेव साहेबराव चव्हाण व त्याचा एक साथीदार राहणार जत्रा हॉटेल आडगाव या दोघांनी संगणमत करून राजकुमार सानप यांच्याकडून सात लाख पन्नास हजार रुपये रक्कम बँकेच्या खात्यावर स्वीकारली रेल्वेत कामाला लावून देतो असे आम्हीच दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आडगाव पोलिसात महादेव साहेबराव चव्हाण यांच्या विरुद्ध 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा भोजन पासून सावध राहण्याचे आवाहन आडगाव पोलिसांनी केले आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत आरोपी अद्याप फरार आहे
