HomeCrimeपंचायत समितीच्या कंत्राटी सहाय्यकास चार हजारांची लाच घेतांना अटक

पंचायत समितीच्या कंत्राटी सहाय्यकास चार हजारांची लाच घेतांना अटक

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांचे गोठ्यासाठी शासकीय अनुदान प्रकरण मंजूर करून देण्याच्या कामाच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्या वडिलांकडून चार हजार रुपयांची लाच स्विकारतांना नारायण विश्वनाथ शिंदे (वय ४२ ) कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पंचायत समिती चांदवड, जि.नाशिक कार्यालयात लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले . पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर अधिक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार , उप अधीक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पोलीस नाईक राजेश गिते, शरद हेंबाडे, अजय गरुड आदी च्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!