Homeराज्यातील बातमीस्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसलेची जयंती साजरी

स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसलेची जयंती साजरी

 

 

संभाजीनगर : वेरुळ

पितृतीर्थ श्री क्षेत्र वेरूळ येथे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांना जयंतीनिमित्त महोत्सव समितीच्या वतीने रविवारी (दि19) संभाजीनगर वेरूळ येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर संस्थानचे श्रीमंत मुधोजीराजे भोसले, राष्ट्रमाता जिजाऊ यांचे वंशज राजे शिवाजीराव जाधवराव हे होते .माजी खासदार चंद्रकांत खैरे हे अध्यक्ष स्थानी होते. या वेळी प्रा प्रदिप सोळंके लिखित स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले यांचे जीवनी वरील पुस्तका चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रा प्रदीप साळुंके यांचे व्याख्यान त्यांच्या अमोघ वाणीने शहाजीराजे भोसले यांच्या इतिहासाच्या अनेक बाबीवर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वारोहण आणि अभिवादन करुण कार्यक्रमला सुरावत झाली. महोत्सव समितीचे अध्यक्ष विलास पांगारकर यांनी सविस्तर घटनाक्रम विषद केलं. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील यांनी केलें तर प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण यांनी केलें तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ त्रिंबक पाटील यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमासाठी विजय काकडे, माधव अवरगंड अभियंता तानाजी हुस्सेकर, प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, विधीज्ञा सुवर्णा मोहिते, प्रा मनीषा मराठे, सुवर्णा तुपे, अशोक वाघ, डॉ. उद्धवराजे पाटील, राजीव थिटे, नितिन कदम, परमेश्वर नलावडे, विकी राज पाटील, राजकुमार गाजरे, विधीज्ञ अशोक मुळे, आदींसह शिवप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!