HomeCrimeअल्पवयीन बालिकेवर बळजबरीने अत्याचार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

अल्पवयीन बालिकेवर बळजबरीने अत्याचार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

धमकी देत बालिकेसोबत बळजबरीने ने शारीरिक संबंध केल्याप्रकरणी न्यायालयाने प्रवीण प्रकाश किरवे (रा. वीर सावरकर नगर, दुर्गा माता मंदिरामागे, जेलरोड नाशिकरोड) या आरोपीस जन्मठेप व १० हजार रुपये  दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जुलै व ऑगस्ट २०१० मध्ये ही घटना नाशिकरोड परिसरात घडली होती .जिल्हा व सत्र न्यायालयाच्या (क्रमांक १२) न्यायाधीश  व्ही. एस. मलकापट्टे – रेड्डी यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे सहायक अभियोक्ता श दीपशिखा भिडे यांनी पुरावा सादर करत युक्तीवाद केला .उपनगर पोलीस ठाणे हददीत जुलै २०१० मध्ये दोन वेळा तसेच ऑगस्ट २०१६  टिळक अपार्टमेंट व नांदुर नाका येथील फ्लॅटवर हा प्रकार घडला वे होता. आरोपी प्रवीण प्रकाश किरवे याने तुझ्या घरच्यांना मारून टाकेल ही  धमकी देत जबरदस्तीने ओमकार नगर येथील टिळक भवन येथे तसेच नांदुर नाका येथील प्लॅटवर दोन दोन वेळाघेऊन जात बलात्कार केला. त्यामुळे आरोपीविरूध्द उपनगर पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ३७६ (२) (आय) (ने) (एन) बालकांचे लैंगिंग अत्याचार प्रतिबंकथक कायदा २०१२ चे कलम ४,८,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.या गुन्हयाचा तपास महिला पोलीस उप निरीक्षक, संध्या तेली यांनी केलेला असून त्यांनी आरोपीविरुध्द् सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने मेहनत घेऊन अतिशय चिकाटीने तपास केला. आरोपीविरूध्द् जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

न्यायालयीन सुनावणी दरम्यान आरोपीविरूध्द फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थिीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस बालकांचे लैगिंग अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ६ मध्ये जन्मठेप व १०,हजार – रुपये दंड, दंड न भरल्यास ०३ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!