July 13, 2026

देवळाली कॅम्पच्या जुन्या स्टेशनवाडीत बिबट्या जेरबंद.

0

 nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :- येथील रेल्वे स्टेशन परिसरातील जुन्या स्टेशन वाडी लगत असलेल्या नाल्यात लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी रात्री १२, साडेबारा वाजेच्या सुमारास एक बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त झाला आहे.nयाच परीसरात अजूनही दोन ते तीन बिबटे मुक्त संचार करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. गेल्या तीन चार दिवसापूर्वी याच भागात एकाच वेळी तीन बिबटे एकत्र मुक्त संचार करीत असल्याची चित्रफित समाज माध्यमावर फिरली होती. परिसरातील रहिवाशांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत नाशिकच्या वन विभागाने पिंजरा लावला होता. पिंजरा लावल्या नंतर दोनच दिवसात शुक्रवारी मध्यरात्री एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्याच्या डरकाळीच्या आवाजाने स्थानिकांनी आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची खात्री पटली. त्याबाबत वन विभागाला माहिती खबर देण्यात आली. शनिवारी पहाटे सहा वाजेला वन विभागाचे पथक वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्या बिबट्याला पिंजऱ्यासह ताब्यात घेऊन वन अधिकारी विजयसिंह पाटील, अशोक खांनजोडे यांनी नाशिक मधील गंगापूर रोपवाटिकेत सुरक्षित हलवले. सदर बिबट्या मादी जातीचा असून त्याचे वय अंदाजे तीन ते चार वर्षांचे आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाईल. अशी माहिती वनविभागाचे अधिकारी विजयसिंह पाटील यांनी दिली. दरम्यान जुन्या स्टेशन वाडी परिसरातील ऊर्वरीत बिबट्यांना देखील पिंजऱ्यात बंदिस्त करून सुरक्षीत स्थळी हलवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *