July 13, 2026

देवळाली महोत्सवात रंगली चित्रकला स्पर्धा

0

 nnदेवळाली कॅम्प :-nमागील ११ वर्षांपासून देवळालीत सामाजिक बांधिलकी जोपासत सुरु झालेल्या देवळाली फेस्टिवलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन नाशिक तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सुधाकर गोडसे यांनी केले.nयेथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संयुक्त प्राथमिक शाळेच्या प्रांगणात देवळाली फेस्टिवल अंतर्गत आयोजित चित्रकला प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद रहाणे, प्रशांत धिवंदे, सुभाष कांडेकर, गोकुळ लोखंडे, भैय्यासाहेब कटारे,लियाकत काझी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोगतातून प्रमोद रहाणे यांनी नाशिक फेस्टिवलच्या धर्तीवर देवळाली फेस्टिवल साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या चित्रकला स्पर्धेत सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये ५ वी ते ७ वी गटासाठी बागेत लहान मुलांसोबत खेळणारे आजोबा, माझ्या शाळेतील स्वच्छता अभियान, आवडती व्यक्ती /नेता माझे स्वप्न तर ८ ते १२ वी या गटासाठी तुम्ही केलेली सामाजिक मदत/कार्य, ऐतिहासिक प्रसंग,देवळाली महोत्सवातील एक स्पर्धेतील क्षण, माझे स्वप्न असे विविध विषय देण्यात आली होते.प्रास्ताविकातून आयोजक जीवन गायकवाड यांनी देवळाली महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. चित्रकला स्पर्धा यशस्वितेसाठी कृष्णा लोखंडे, राजेंद्र ताजनपुरे, राजश्री मोजाड, पंकज निसाळ, राहुल हळदे, निशा कातकाडे, नीता कर्पे आदी प्रयत्नशील होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *