वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचे अर्धवट काम पूर्ण करण्यात आ ढिकले
आमदार राहुल ढिकले यांनी जेलरोड येथील लोककवी वामनदादा कर्डक स्मारकाला भेट दिली. वामनदादा कर्डक स्मारकाचे राहिलेले काम आपण लवकरच पूर्ण करून लोकार्पण करण्यात येईल अशी माहिती आमदार राहुल ढिकले यांनी दिली आहे. लोककवी वामनदादा कर्डक येथील स्मारकात राहुल ढिकले आले होते. जेलरोड येथील लोककवी वामनदादा कर्डक स्मारकाची पाहणी केली . यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे उपस्थित होते. अनेक वर्षांपासून स्मारकाचे काम रखडले आहे स्मारकाला उतरती कळा लागली आहे. गणेश सोनवणे यांनी स्मारकात मोडकळीस आलेल्या कामांची माहिती आमदार दिघे यांना दिली स्मारकातील काम लवकरात लवकर पूर्ण करून द्यावे असे गणेश उन्हवणे व शशी उन्हवणे यांनी आमदारांना सुचित केले . वामन दादा कर्डक स्मारकाचे उर्वरित काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आमदार राहुल ढिकले यांनी लवकरच येत्या काळामध्ये जिल्हा नियोजन बैठकीत, मुख्यमंत्री व स्वतःच्या निधीतून तातडीची निधी उपलब्ध करून देतो व तात्काळ कामाची सुरुवात करण्याचे उपस्थितांना आश्वासित दिले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशी उन्हवणे,ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुजकर, हरिभाऊ जाधव, भैय्या बाहेती,नितीन पगारे,प्रदीप विर,गिरीश जगताप,सुखदेव वार्डे,रामा शिंदे,सुधीर पगारे,जावेद शेख,बिलाल शेख,मोबीन खान, अबिद शेख,शाहरुख खान, शादाब शेख,रवी पगारे,शिरीष गांगुर्डे,दर्शन पगारे,शरद सोनवणे,प्रशांत पाटील,गोविंद शिंगारे,नवनाथ माने,मुरली कोळे,मनोज अहिरे,सुनिता कर्डक,मुक्ता खर्जुल,अलका निकम,लक्ष्मी गडगडे,निर्मला सोनवणे,गयाबाई काळे,अश्या अनेक महिला आणि पुरुष कार्यकर्ते व गायक/कलावंत उपस्थित होते. दि हिंद न्यूज सतीश रुपवते नाशिक