शिर्डी संस्थांचा भाविकांवर अतिरेक..
शिर्डीच्या साई संस्थांमध्ये अक्षरशः भक्तांची लूट केली जात आहे. शिर्डी देवस्थान हे देवस्थानांमध्ये नावलौकिक देवस्थानातून या देवस्थानात जगभरातून भक्त ये जा करत असतात. साई मंदिरात रांगाच रांगा लागत असतात साई दरबारातली रांगली मोठी असते मात्र येथील रांगेतील प्रत्येक माणसाला दोनशे रुपये जातात. साई मंदिरात व्हीआयपी दर्शनाचे दोनशे रुपये घेतले जातात सामान्य जनतेस दर्शन मात्र फुकट आहे मोफत दर्शनाचा लाभ अनेक साई भाविक घेतात मात्र शासकीय अधिकारी नोकरदार व्हीआयपी खासदार आमदार पत्रकार यांचे नातेवाईक यांच्याकडून व्हीआयपी दर्शनाचे साई संस्थान दोनशे रुपये घेतात. या व्हीआयपी लोकांना दर्शनासाठी कमी भाविक असलेल्या रांगेत उभे राहावे लागते मात्र रांग ही प्रत्येकाला आहे. याच मंदिरात गाव दर्शनासाठी एक द्वार तयार करण्यात आले आहे त्या द्वारे फक्त गावकरी जात असतात. मात्र गावकरी दरवाजा हा फार कमी लोकांना माहिती आहे. गाव दरवाजाकडून जाण्यासाठी शिर्डी मधील रहिवासी असणे गरजेचे आहे तसेच त्या भाविकांकडे शिर्डी येथील आधार कार्ड असणे गरजेचे आहे. मात्र याच दरवाजाने अधिक शिर्डी बाहेरील भाविक शिर्डी संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या संघांमताने या दरवाजातून मोफत जातात आणि व्हीआयपी दर्शनाचे दोनशे रुपये वेगळे. शिर्डी संस्थानाच्या भांडाफोड करण्याचा प्रयत्न अनेक पत्रकारांनी केला मात्र या पत्रकारांवर शिर्डी संस्थाने 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले. अशी पत्रकारांची संख्या तब्बल 19 आहे. 19 पत्रकारांनी शिर्डी संस्थान च्या कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शिर्डीत दाखल आहे. शिर्डी संस्थाने या पत्रकारांची तोंड का दाबली ? काय कारण होते की पत्रकारांवर असा गंभीर गुन्हा दाखल करण्याची वेळ शिर्डी संस्थान वर आली ? पत्रकारांना शिर्डी संस्थान मध्ये जाण्यास मज्जाव का करण्यात येतो ? एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शिर्डी संस्थान द्यायला हवी प्रश्न करण आमचं काम आहे उत्तर द्यायचं का नाही हे शिर्डी संस्थान ठरवायला हवं. शिर्डी संस्थान चा पुढील वृत्तांत पुढच्या भागात लवकरच भेटू या
