October 7, 2026

तथागत भगवान गौतम बुद्धांची विशाल अस्थीधातू कलश धम्मया यात्रा.

0

विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणा नंतर अडीच हजार वर्षापासून थायलंड येथे जतन करून ठेवलेला तथागत भगवान गौतम बुध्दांचा पवित्र अस्थीधातू कलश प्रथमच भारतात आला असून थायलंड येथील ११० पूज्य भिक्खू संघासह परभणी येथून भव्य पदयात्रेने चैत्यभूमी, मुंबई येथे जात आहे.nह्या पवित्र अस्थीधातू कलशाचे आज नाशकात आगमन झाले. औरंगाबाद रोड मार्गाने टाकळी येथून या पवित्र असते त्रीरश्मी nलेणी येथे घेऊन जाणार आहेत या अस्थीचे पूजन केल्यानंतर दादर चैत्यभूमी मार्गाला मुंबई महामार्ग या मार्गाने प्रस्थान होईल. तथागत गौतम बुद्धांच्या अस्थींचा ठिकठिकाणी पूजन करण्यात आलं या याप्रसंगी बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांचा पदयात्रेत समावेश होता. भगवे वस्त्र परिधान केलेले भिकू संघाचे अनेक भिकू या पदयात्रेत सामील झाले होते हातात निळा व तिरंगा घेऊन गौतम बुद्धांचे अनुयायी पदयात्रेत मार्गक्रमण करीत होते. बुद्धम् शरणम् गच्छामी संगम शरणम गच्छामि या त्रिशरण व पंचशीलाने परिसरात मंगलमय वातावरण होते. बंधन कडून साधू साधू असा आशीर्वाद दिला जात होता. या पदयात्रेची सांगता दादर येथील चैत्यभूमी येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *