August 8, 2026

गेट वेल सून प्रशासनाला निवेदन

0

nविषय महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा 2021 संदर्भात दोन वर्ष उलटूनही रुग्ण हक्कच्या मुद्द्यावर वैद्यकीय आरोग्य प्रशासन उदासीन असून समितीच्या सहा महिन्यांच्या पाठपुराव्यासह कायदेशीर मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल उदासीन, दप्तर दिरंगाई करणारे प्रशासनास लवकर बरे व्हावे यासाठी *गेटवेल सून* सदिच्छा अभियान राबविण्यात संदर्भात निवेदन.n *तक्रार निवारण कक्षासाठी विलंब होत असल्याने टोल फ्री क्रमांकासाठी लोक वर्गणीद्वारे रूपये 13,500/- मनपा प्रशासनास जन आरोग्य समिती नाशिक देणार.* nमहाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट 2021 प्रमाणे सर्वच खाजगी दवाखान्यात रुग्णहक्क सनद, किमान 15 वैद्यकीय सेवांचे दर पत्रक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकल सुपरवायझिंग ऑथॉरिटी जबाबदारीनुसार आपण रुग्णांच्या तक्रारी आणि सूचना यांच्यासाठी तक्रार निवारण कक्ष उभारणी ;करणे आणि त्यासाठी टोल फ्री नंबर उपलब्ध करणे आवश्यक आहे. आम्ही वरील विषयांवर प्रशासनाशी सतत्याने संवाद साधत आलो आहोत. निवेदन देत आलो आहोत. या विषयाची जबाबदारी असलेल्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त यांच्याशी सतत्याने पाठपुरावा करीत आलो आहोत.nमहानगरपालिका यांच्याकडे *MNHRA-21 सदर कायद्याची अंमलबजावणी झाल्याची अद्यावत माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही* . अर्थात आजही बहुतांश दवाखान्यात रुग्णहक्क सनद दरपत्रक प्रदर्शित झालेले नाही आणि आपण रुग्णांसाठी टोल फ्री नंबर उपलब्ध करून दिलेला नाही हे वास्तव आहे. हे वास्तव जन आरोग्य समितीचे खाजगी दवाखाने भेटीच्या माध्यमातून आम्ही 13 जानेवारी 2023 रोजी रोटरी सभागृह नाशिक येथील रुग्णहक्क परिषदेत आपल्या प्रतिनिधी डॉक्टर कुटे आणि प्रसार माध्यम चे प्रतिनिधी यांच्यासमोर मांडले आहे. या सर्वेत नमूद केल्याप्रमाणे आम्ही आपणास विनंती करीत आहोत की रुग्ण हक्काच्या अंमलबजावणीसाठी आपण खालील उपाययोजना कराव्यात.n1) महानगरपालिका नाशिकच्या वतीने लोकल सुपरवायझिंग ऑथॉरिटी म्हणून आपण महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा 2021 नुसार पुढील पंधरा दिवसात तक्रार निवारण कक्षाची स्थापना करावी.n2) तक्रार निवारण कक्ष स्थापना करताना संस्था आणि संघटनांची सल्लागार समिती स्थापन करावी.n3) महानगरपालिका प्रशासनाने पुढील एक महिन्याचे आत सर्व खाजगी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन या नियमांची पालन होते की नाही याची तपासणी करावी आणि हे नियम ना पाळणाऱ्या हॉस्पिटल वर कारवाई करावी.n4) रुग्णहक्क सनद दरपत्रक आणि तक्रार निवारण कक्षाची माहिती प्रदर्शित ना करणाऱ्या हॉस्पिटल्स यांची नोंदणी निलंबित करावी.nवरील मागण्यांवर प्रशासन गंभीर्याने दखल आणि प्रत्यक्ष कृती करीत नाही म्हणून आम्ही सात फेब्रुवारी 2023 ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधी दरम्यान *लवकर बरे व्हा!( गेट वेल सून*) हे अभियान राबविणार आहोत. यात 7 फेब्रुवारी 2023 रोजी आपणास निवेदन देणार आहोत. *टोल फ्री नंबर साठी मनपा प्रशासनास विलंबन होण्याचे कारण आर्थिक असल्याने त्यानंतर एक आठवडा टोल फ्री नंबर साठी मनपा प्रशासनास येणारा खर्च 13500 लोक वर्गणी द्वारे गोळा करून देणार आहोत* तसेच शहरातील ज्या दवाखान्यात रुग्णहक्क आणि दरपत्रक प्रदर्शित केले नाही त्या दवाखान्याला कायद्याची प्रत देऊन त्यांची माहिती सोशल मीडियावर प्रदर्शित करणार आहोत या निवेदनास गंभीर्याने विचार करून रुग्ण हक्काच्या तसेच हिताच्या या न्याय मागण्या तातडीने सोडवाव्यात ही विनंती.n जन आरोग्य समिती : संतोष जाधव, गौतम सोनवणे, शोभा पवार, फईम शेख, हिरामण तेलोरे, मोहन जाधव, नाजिम काजी हे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *