August 6, 2026

प्रसंग अवधानाचे भान राखले महापालिकेच्या ड्रायव्हरने विझवली बसची आग.

0

नाशिकरोड प्रतिनिधी | उपनगर सिग्नल येथे दि २५ फेब्रुवारी २०२३ रोजी अचानक महामंडळाच्या नाशिक-शिर्डी प्रवाशांनी भरलेल्या बसने ड्रायव्हर केबिनमध्ये पेट घेतला यावेळी मागून येत असलेल्या नाशिक महापालिकेच्या जलवाहतूक करणाऱ्या टँकर वरील महापालिका कर्मचारी श्री पंकज जगळे ड्रायव्हर यांनी प्रसंगावधान परिस्थिती लक्षात घेता. त्वरित बस ड्रायव्हरच्या मदतीला धावले. आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बसच्या बाहेर उतरवत. त्वरित मनपा जलवाहतूक टँकरचा पाईप बसवर धरत पाण्याचा मारा केला. आणि लागलेली आग आटोक्यात आणली व मोठा अनर्थ टाळला. याच धाडसाचे गौरव म्हणून आज दि २६ फेब्रुवारी २०२३ रोजी जेलरोड येथे भाजप कमिटीच्या वतीने मनपा कर्मचारी श्री पंकज जगळे यांचा शाल व सावरकर पुण्यतिथी निमित्त त्यांची प्रतिमा देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी मान्यवर गणेश सातभाई, सचिन हांडगे, राहुल कोथमीरे, योगेश कपीले, राहुल तुपे, मनोज लोळगे, मयूर रहाणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *