August 6, 2026

४० हजारांची लाच घेतांना प्रतिलीपीकास अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

0

nनाशिक : वार्ताहर : भूमि अभिलेख कार्यालयात ४० हजारांची लाच स्वीकारताना प्रतिलीपीकास लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकnपथकाने अटक केली. सोमवारी (दि २७) nपळसे येथील वडिलांच्या मालकीच्या शेती गट क्रमांकांची मोजणी करून त्यामध्ये असलेले पोट हिस्स्याच्या खुणा दाखवून त्याबाबत कच्चा नकाशा काढून देण्यासाठी वैयक्तिक मेहनताना म्हणून प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे चाळीस हजार रुपये व सदर नकाशावर शासकिय शिक्के व सही आणून देण्यासाठी प्रत्येक गटाचे 50 हजार याप्रमाणे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांनी फक्त हद्दीच्या खुणा दाखवून देण्यास सांगितल्याने प्रत्येक गटाचे दहा हजार याप्रमाणे चार गटांचे 40 हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या nनिलेश शंकर कापसे (वय- 37 वर्ष, धंदा- प्रतिलिपी लिपिक, भूमी अभिलेख कार्यालय, नाशिक रा.- नवोदय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नंबर 6, उदयनगर, मखमलाबाद रोड नाशिक) यास अटक केली. nपोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परीक्षेत्र शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक nनरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. n पोलीस निरीक्षक संदीप घुगे,हवालदार एकनाथ बाविस्कर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे आधीच्या पथकाने केली. nआवाहानn*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *