August 8, 2026

छगन भुजबळांना कोरोनाची लागण

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आली आहे. भुजबळ हे सोमवारी  येवला दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांना ताप आल्याने ते दौरा आटपून सायंकाळी ४ सुमारास परत आले असता.  नाशिक येथे खासगी रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता अहवालातून ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.nnयासंदर्भात छगन भुजबळ यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क ध सॅनिटायझरचा वापर करण्याचे  आवाहन भुजबळांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *