August 7, 2026

पाच हजारांची लाच घेतांना ग्रामसेवक

0

 nnअहमदनगर : कर्जतnnशेतकरी असलेले तक्रारदार हे शासनाच्या गाय गोठा योजने अंतर्गत अनुदानासाठी पंचायत समिती कर्जत येथे प्रकरण सादर केले होते. ते प्रकरण मंजूर करून देण्यासाठी ग्रामसेवक चांदे खु यांनी तक्रारदार यांचेकडे ७ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. गट विकास अधिकारी कर्जत अमोल जाधव यांचे कडून सदर प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे अमोल जाधव करिता ७ हजाराची लाचेची मागणी करून प्रथम ५ हजार व काम झाल्यानंतर २ हजार स्विकारण्याचे निश्चित झाले. मंगळवारी (दि१०) चांदे खुर्द येथे तक्रारदार यांचे कडून ५ हजाराची लाच रक्कम स्वीकारतांना ग्रामसेवक ओंकार ईश्वर आवटे, (वय २५, चांदे खुर्द, ता- कर्जत, जि. अहमदनगर ) स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले .nमिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रक्रिया चालू आहे . सापळा अधिकारी पोलीस निरीक्षकnशरद गोर्डे,पोलीस अंमलदार रमेश चौधरी, बाबासाहेब कराड आदी च्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *