August 7, 2026

खंडणी विरोधी पथकाची कामगिरी रेकाँरडवरील संशयित गुन्हेगार ताब्यात

0

नाशिक : शहरnघातक हत्याराचा वापर करून मारामारी करण्यासोबतच ते बेकायदेशीर मंडळी जमवून हल्ला करण्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील संशयित समर्थ दत्तात्रय तायवाडे (२१, रा. गणेश चौक, क्रांतीनगर, मखमलाबादरोड) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मंगळवारी (दि. ११) यश आले. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार विठ्ठल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिबीएस शिवाजी रोड येथुन सापळा लावत समर्थ तायवाडे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याची माहिती समोर आल्याने खंडणी विरोधी पथकाने त्याला पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलिस ठाण्यास सुपुर्द केले आहे. तायवाडे याच्यावर पंचवटी पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. खंडणी विरोधी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलिस हवालदार किशोर रोकडे, पोलिस नाईक योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलिस अंमलदार विठ्ठल चव्हाण, स्वप्नील जुंद्रे, चारुदत निकम, भूषण सोनवणे, भगवान जाधव व महिला पोलिस शिपाई सविता कदम यांनी महत्वाची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *